*गौराईमळा शाळेत स्वातंत्र्य दिनी मुलांना मोफत बुट साॅक्स वाटप व प्रज्ञाशोध मधील विद्यार्थ्याचा सत्कार*
इंदापूर प्रतिनिधी:भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौराईमळा येथे विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. *प्रभात फेरी , ध्वजारोहण , राष्ट्रगीत , ध्वजगीत , संविधान वाचन ,निपुन भारत प्रतिज्ञा , तंबाखुमुक्त प्रतिज्ञा विद्यार्थी भाषणे , लेझीम , सत्कार , खाऊ वाटप* असे विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आला मुलांची भाषणे , लेझीम वर सुंदर नृत्य करुन उपस्थिती पालकांनी दाद दिली. कौतुक केले. या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासजी शिंगाडे यांनी सर्व मुलांना मोफत बुट व साॅक्स वाटप केले.या वेळी पंचायत समिती इंदापुर यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेतील इयत्ता ३ री व इयत्ता ४ थीतील मुलांचा प्रमाण पत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
त्यामध्ये मंथन परीक्षेतील तनिष्का सुंदर बनसोडे हिचा प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला तसेच इंदापुर तालुका प्रज्ञाशोध परीक्षा २०२३ प्रमित प्रताप शिरसट तालुक्यात २६ वा क्रमांक ३०० पैकी २६० गुण प्रणित प्रताप शिरसट गुण २४८स्नेहल सतीश चावले गुण २४४
आर्यन किशोर जाधव गुण २३८ ज्ञानेश्वरी राजेंद्र होले गुण २३८आदर्श सोमनाथ गायकवाड गुण २०२ त्रिषा पोपट शिंगाडे गुण १८६ इयत्ता ३ री तील शर्वरी श्रावणकुमार जाधव गुण १८८संस्कृती विलास शिंगाडे गुण १७६आयान गुलाब शेख गुण १६२
यावेळी शामराव जाधव सेवा निवृत्त मुख्याध्यापक अरुण जाधव सर व नाझरकर भाऊसाहेब यांनी मनोगत व्यक्त केली मुलांचे व शाळेचे कौतुक केले या वेळी शेळगाव केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख सन्मान मारुती सुपुते साहेब उपस्थितीत राहिल्या बद्दल सत्कार करण्यात आला तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास शिंगाडे यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी शेळगाव गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष तात्यासाहेब शिंगाडे , ग्रामपंचायत सदस्या प्रियंका जाधव अमोल नाझरकर श्रावणकुमार जाधव विठ्ठल शिंगाडे राजु शेख गुलाब शेख जगन्नाथ जाधव विनोद जाधव पद्मराज जाधव संजय आटोळे किशोर जाधव प्रविण जाधव अमोल जाधव विनोद जाधव रेश्मा जाधव मनिषा शिंगाडे प्रियांका शिंगाडे रंजना बनसोडे शितल नाझरकर पुनम जाधव मनिषा शिंगाडे मनिषा जाधव सारिका शिंगाडे सायरा शेख रेश्मा शेख बहुसंख्येने महिला , जेष्ठ नागरिक , विद्यार्थी , पालक , अंगणवाडी सेविका सुनिता सोनवणे मदतनीस कल्पना जाधव उपस्थितीत होत्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी केले तर नियोजन उपक्रमशील शिक्षिका जुबेदा पठाण मॅडम यांनी केले तसेच आभार पठाण मॅडम यांनी मानले

