shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित  प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल 
विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
          स्वातंत्र्यदिन हा आपल्या भारतातील सुवर्ण दिन असून हा आपला राष्ट्रीय सण आहे.या मंगलमय दिनाची प्राप्ती हजारो देशभक्ताच्या बलीदानातून झाली.स्वातंत्र्य दिनानिमित्त शैक्षणिक संकुलामध्ये जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सदस्य जि. प.पुणे श्रीमंत ढोले सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . राष्ट्रगीत, राज्यगीत, झेंडागीत संचलन ,देशभक्तीपर नृत्य इत्यादीचे नेत्र दीपक सादरीकरण करण्यात आले. स्वातंत्र्यदिना विषयी आपले बोबडे मनोगते बालचमूने  व्यक्त केली. 'मेरी माटी मेरा देश' या अभियाना अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या गावची एक मूठ माती आणून त्याचे एकत्रीकरण करण्यात आले ;यामधूनच विद्यार्थ्यांमध्ये आपल्या मातृभूमी विषयी प्रेम जागृत करून एक सुजाण नागरिक घडावा .नुकतेच भारत देशाने श्रीहरीकोटा आंध्रप्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून  चांद्रयान-3 चे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याचीच प्रतिकृती प्रशालेमध्ये 20 फूट उंचीची करून चित्ररथाचे  नेत्र दीपक प्रदर्शन करण्यात आले. या उद्देशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने नासा ,इस्त्रो यासारख्या वैज्ञानिक संशोधन क्षेत्रामध्ये सहभागी होऊन आपले नावलौकिक करुन आपल्या  गावाचे,देशाचे नाव मोठे करावे .
विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता त्याचा योग्य कामासाठी सदुपयोग करावा आपल्या भारत देशाला महासत्ता बनवण्यासाठी  तसेच सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनण्यासाठी शालेय शिस्त, कला ,स्पर्धा, अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच स्वतःची शोधकवृत्ती, कल्पकता, विकसित करणे गरजेचे आहे. असे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
 यावेळी जय भवानीगड विकास प्रतिष्ठान ,लाखेवाडी संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सदस्य जि.प.पुणे श्रीमंत ढोले सर,लाखेवाडी गावच्या विद्यमान सरपंच चित्रलेखा ढोले मॅडम,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे सर ,संस्थेचे प्रमुख प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव सर,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पवार सर,संस्थेचे मुख्याध्यापक राजेंद्र सरगर सर,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य . डॉ.सम्राट खेडकर सर ,सर्व विभागाचे सुपरवायझर ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद  ,विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक   यांच्या  उपस्थितीत पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमंत गुरव सर व रेश्मा अनपट यांनी केले.
close