shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एल. जी. बनसुडे विद्यालयामध्ये 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

एल. जी. बनसुडे  विद्यालयामध्ये 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:पळसदेव(ता. इंदापुर) येथील एल.जी.  बनसुडे विद्यालयामध्ये 76 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध वेशभुषा साकारल्या त्यामध्ये महात्मा गांधी, ज्योतिराव फुले, किरण बेदी,झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, भगतसिंग, राजगुरु,माहाराणी ताराबाई, लोकमान्य टिळक, भारतमाता पंडीत नेहरू,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादी. थोर समाजसुधारकच्या वेशभूषा साकारल्या होत्या व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन देशाविषयी असणारे प्रेम आणि विचारवंतांची  माहिती सादर केली व 17 वर्षे  व 19 वर्षे वयोगटातील मुलिंचा प्रेक्षणीय कब्बडी सामणा घेण्यात आला प्राचार्या वंदना बनसुडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून विद्यार्थ्यांना बंधुभावाने राहून उत्तरोत्तर  प्रगती करावी असा संदेश दिला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत नाना बनसुडे , पालक वर्गामधून उत्तम बनसुडे यांनी आपल्या मनोगतातून देशाविषयी आपुलकी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्नवादी राहावे असा संदेश दिला . यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. शितलकुमार शहा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, कार्याध्यक्षा सौ.नंदाताई बनसुडे सदस्या अनुराधाताई कणके, अर्चनाताई बनसुडे, हनुमंत मोरे, बाबा (आप्पा) बनसुडे. अंकुश बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, किरण काळे मुख्याध्यापक राहुल वायसे सर तसेच पालकवृंद , सर्व विभाग प्रमुख व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन प्रविण मदने सर व आभारप्रदर्शन ज्योती मारकड मॅडम यांनी मानले.
close