shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

येडेश्वरी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी- चेअरमन बजरंग सोनवणे.!!


_________________
 माजी नगरसेवक कपिल मस्के यांचा केज नगरपंचायत मधील अभद्र युतीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश.
_________________

येडेश्वरी साखर कारखान्यावर स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
-------------------
प्रकाश मुंडे  / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
                                                    
येडेश्वरी साखर कारखान्याच्या प्रांगणात  ७६ वा स्वातंत्र्य दिन कारखान्याचे चेअरमन मा.श्री.बजरंगबप्पा सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प सदस्य शंकर उबाळे ,कारखान्याचे संचालक बाळकृष्ण भवर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष नंदकुमार मोराळे,मा.डॉ चाटे,श्री. विलास अप्पा जोगदंड,मुकुंद मामा कणसे, पंचायत समिती सदस्य प्रेमचंद कोकाटे,पिंटू ठोंबरे,उमाकांत भुसारी,नगरसेवक भाऊसाहेब गुंड,युनूस शेख, मुस्तफा खुरेशी, शरीफ सय्यद, चंद्रकांत खरात ,बाजारसमितीचे संचालक,सरपंच, से.सो.चेअरमन  शेतकरी सभासद,वाहतूक ठेकेदार,खाते प्रमुख ,कर्मचारी शेतकरी वर्ग, कार्यकर्ते इदयादी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रस्थाविक संचालक बाळकृष्ण भवर यांनी बोलताना कारखान्याचा लेखा जोखा मांडून शेतकऱ्यांचे हित व येडेश्वरी कारखान्याच्या प्रगतीचा आलेख मांडला.
त्यानंतर डॉ चाटे,चंद्रकांत खरात,प्रेमचंद कोकाटे,नंदू दादा मोराळे,गणेश नांदे,भावा लोमटे, आदी मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.
   
अध्यक्षीय समारोपाच्या अगोदर   श्री विनोद गुंड यांच्या क्रिडा अकॅडमीला येडेश्वरी फाउंडेशन च्या वतीने रोख 51 हजार रुपयांची मदत करण्यात आली,त्या नंतर केज शहरातील दलित समाजाचे नेते नगरसेवक कपिल मस्के व त्यांच्या सहकाऱ्यांचा बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेशाचा कार्यक्रम झाला व प्रवेश केलेले सचिन थोरात व कपिल मस्के यांनी मनोगत व्यक्त केले.कपिल मस्के यांनी नगरपंचायत मध्ये झालेल्या अभद्र युतीला कंटाळून व त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना झालेल्या त्रासाबद्दल माहिती मांडून आपण बजरंग बाप्पांच्या नेतृत्वामध्ये यापुढे काम करणार असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय समारोपमध्ये बजरंगबप्पा सोनवणे म्हणाले कि,२०२३ - २४ या गळीत हंगामध्ये येडेश्वरी कारखाना १० लाख में.टन उसाचे गाळप करणार असल्याचे सांगितले. प्रत्येक वर्षी प्रमाणे या हि वर्षी बीड जिल्ह्यात उसाला सर्वाधिक भाव देण्यासाठी नियोजन करू असे म्हणाले. तसेच येडेश्वरी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहिलेला आहे, मागील दोन वर्षांमध्ये केज तालुक्यातील जवळपास १४०० शेतकऱ्यांना ऊस पिक कर्ज कारखान्याच्या सहकार्याने देण्यात आले, त्याच प्रमाणे याही वर्षी ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यासोबत कारखान्याचा लेखाजोखा मांडला.कर्मचारी,वाहतूक ठेकेदार,ऊस उत्पादक शेतकरी आदींच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती दिली. व भागातील शेतकऱ्यांना आपल्याच कारखान्याला ऊस गाळपासाठी द्यावा असे आवाहनही केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण शिंदे यांनी केले.

                
close