shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यातील ७८ विना अनुदानित महाविद्यालये अनुदानित करावित मागणीसाठी आंदोलन

राज्यातील ७८ विना अनुदानित महाविद्यालये अनुदानित करावित मागणीसाठी आंदोलन

अशोकनगर प्रतिनिधी:
राज्यातील ७८ विना अनुदानित महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी मान्य करावी अन्यथा याप्रश्नी विधानभवनावर निषेध मोर्चा तसेच महिला अध्यापक मुंडन आंदोलन करतील असा इशारा अशोक महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य सौ.सुनिताताई गायकवाड यांनी दिला आहे.                                

मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यातील विना अनुदानीत ७८ महाविद्यालयाच्या प्राध्यापक व कर्मचा-यांचा शंभर टक्के अनुदानाच्या मागणीसाठी गेली १७८ दिवसांपासून अंदोलन सुरु आहे.तथापि शासनाने अद्यापी याची दखल घेतलेली नाही.यामुळे संबंधित अध्यापक वा कर्मचारी यांच्यात असंतोषाची भावना आहे.सदर आंदोलनात अशैक महाविद्यालयाचे अध्यापक वा कर्मचारी माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली आंदोलनात सहभागी झाले आहेत.
यावेळी आझाद मैदानावर आंदोलनकर्त्यांना संबोधताना प्रा.सौ.गायकवाड म्हणाल्या की, सन २००१ पूर्वी मान्यता प्राप्त विना अनुदानित ७८ महाविद्यालयांचा आनुदान मान्यतेचा प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित आहे.सदर प्रस्ताव अर्थ विभाकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे.सदरचा प्रस्तावशासनाने तातडीने मंजूर करावा अन्यथा याप्रश्नी विधान भवनावर निषेध मोर्चा तसेच महिला अध्यापक व कर्मचारी मुंडन आंदोलन करतील आसा इशारा त्यांनी दिला.                   

 यावेळी डाॕ.भाऊसाहेब झिरपे, डाॕ. रामदास नाईकनवरे,बाळासाहेब तौर,डाॕ.संतोष जाधव,प्रा.संकेत कुरणे,प्रा.आशा गायकवाड यांचेसह प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर -
9561174111
close