शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
धार्मिक बातमी
श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय देवीचा माळ या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. नितीन तळपाडे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय काळे सर व ज्येष्ठ लिपिक श्री आप्पा मेहेर सर हे होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी अण्णाभाऊ साठे यांच्या खडतर प्रवासाचे वर्णन केले व विविध साहित्याबद्दल माहिती दिली तसेच प्रमुख पाहुणे यांची भाषणे झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रोहन भालेराव सर यांनी केले व आभार श्री गणेश सातपुते सर यांनी मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

