shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रा.रामेश्वर दुसुंगे यांना नांदेड विदयापीठाची 'विद्यावाचस्पती पदवी' प्रदान



प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : ४ /  न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर महाविदयालयात कार्यरत असलेले प्रा. रामेश्वर दुसुंगे यांना स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विदयापीठ, नांदेड यांनी नुकतीच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान केली आहे.

 प्रा. दुसुंगे यांनी 'रिप्रेझेंटेशन ऑफ मुंबई इन द सिलेक्ट इंडियन इंग्लिश नॉव्हेल्स या विषयावर इंग्रजीतून प्रबंध सादर केला होता. त्यांना प्रा. डॉ. रोहिदास नितोंड, परभणी यांचे मार्गदर्शन लाभले. गेल्या २६ वर्षांपासून ते इंग्रजी आणि कायदा विषयांचे अध्यापन करीत असून विविध राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून अनेक सेमिनार आणि परिसंवादासाठी विषय तज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. 

सन २०२० साली त्यांना नामांकित इंटरनॅशनल बिझनेस कौन्सिल, नवी दिल्ली यांचेतर्फे 'भारत विदयारत्न' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार नवी दिल्ली येथे शानदार व दिमाखदार समारंभात प्रदान करण्यात आला. तसेच सन २०१६ साली दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून त्यांच्या शोधनिबंधास मान्यता ही देण्यात आली आहे. 'इंग्लिश फॉर लॉ अॅण्ड कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स' या विषयावर पुस्तकेही प्रसिदध झालेले आहे.

या यशाबददल त्यांचे अहमदनगर जिल्हा मराठा विदया प्रसारक समाज, अ.नगर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्रजी दरे सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासरावजी आठरेपाटील, खजिनदार डॉ. विवेक भापकर तसेच सर्व विश्वस्त आणि कार्यकारीणी मंडळ, प्राचार्य एम. एम. तांबे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे. सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .
close