shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगरकरांनी केला चांद्रयान ३ मोहिम यशस्वीतेचा आनंद साजरा ....


चौपाटी कारंजा तरुण मंडळाने
पेढे वाटून केला आनंद व्यक्त

प्रतिनिधी :  संजय वायकर

नगर : २४ / चांद्रयान ३ मोहिम २३ ऑगस्ट ला यशस्वी झाली . आणि संपुर्ण भारत देशात हा आनंद मोठ्या उत्साहात मिठाई वाटप करून  फटाक्यांची आतिष बाजी करत साजरा करण्यात आला. नगर शहर येथे सर्व नागरिकांनी आनंद व्यक्त केला .

चौपाटी कारंजा मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल भंडारे , उपाध्यक्ष सुचित भळगट, सचिव महेश कुलकर्णी , अरविंद मुनगेल , विक्रांत सातपुते , अनिकेत पाटोळे , मनिष भंडारे , आदिनाथ येंडे , मयुर कुलकर्णी , आर्यन सूर्यवंशी , महेंद्र ताकपिरे, वसंत गहिले आणि मित्र मंडळाने
नगर येथे चांद्रयान ३ यशस्वीतेचा आनंदाने जल्लोष करत साजरा केला . फटाक्यांची आतिष बाजी करण्यात आली. तर नागरिकांना पेढे वाटण्यात आले.यावेळी परिसरातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

 चांद्रयान-२च्या अपयशानंतर खचून न जाता, इस्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करण्यासाठी पुन्हा मोहीम हाती घेतली आणि १४ जुलैला चांद्रयान-३ अवकाशात झेपावले. आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. 

ही मोहीम सफल बनवण्यासाठी राबणाऱ्या सर्व  शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात आले.
close