shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर इंदापूर मध्ये जल्लोष; भाजप ओबीसी मोर्चा वतीने शहरात जल्लोष...


चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर इंदापूर मध्ये जल्लोष; 
भाजप ओबीसी मोर्चा वतीने शहरात जल्लोष...
इंदापूर प्रतिनिधी: भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर राज्यभर जल्लोष साजरा केला जात आहे. विविध ठिकाणी फटाके फोडून आणि पेढे भरवून हा आनंदाचा क्षण साजरा केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात  चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगचा उत्साह पाहायला मिळाला. भाजपचे ओबीसी मोर्चाचे तालुका अध्यक्ष पांडुरंग शिंदे  यांसह अनेकांनी लाईव्ह प्रक्षेपण बघत यशस्वी लँडिंग होताच शहरात जल्लोष साजरा केला. मोठ्या संख्येने तरुण या निमित्ताने जल्लोष करण्यासाठी शहरातील रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. भारत माता की जय, वंदे मातरम् च्या जयघोषानेने अवघं इंदापूर शहर दुमदुमलं होते..
close