shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुरज काळे यांची सहकार सेना शिवसेनेच्या विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र या पदावरून राष्ट्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष या पदावर पदोन्नती

सुरज  काळे यांची सहकार सेना शिवसेनेच्या विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र या पदावरून राष्ट्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष या पदावर पदोन्नती
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील सुपुत्र सुरज काळे यांचे इंदापूर तालुका सहकार सेना शिवसेना यामध्ये तालुका संघटक ते पश्चिम महाराष्ट्र सचिव अशी पदोन्नती होत घोडदौड चालू होती त्यांच्या संघटन कौशल्या मधून नुकतेच त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष खा. आनंदराव अडसूळ  यांच्या अध्यक्षतेखाली  बाळासाहेब भवन , शिवसेना कार्यालय मुंबई येथे राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली यावेळी सुरज वसंत काळे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलीअसल्याचे काळे यांनी माहिती देताना सांगितले आहे.
तसेच सहकार सेनेच्या वतीने दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी  नियुक्त्या देण्यात आल्या. यावेळी  मा. खा. आनंदराव अडसूळ  सहकार सेना प्रमुख , माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री व  आशाताई विचारे-मामेडी  राष्ट्रीय कार्याध्यक्ष, आनंद यादव राष्ट्रीय सरचिटणीस ,प्रा. नागेश वनकळसे राष्ट्रीय उपाध्यक्ष, , सुरज काळे राष्ट्रीय उपाध्यक्ष ,  सहकार सेना शिवसेना  व वैभव देशमुख जिल्हा प्रमुख सोलापूर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत  योगेश दशरथ घोरपडे रा. वाघोली ता. शेवगांव जिल्हा अहमदनगर यांची अहमदनगर जिल्हा प्रमुख  या पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे, अमोल बाळासाहेब खोटे- जगताप रा. पारेवाडी ता. करमाळा जिल्हा सोलापूर यांची करमाळा तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली, श्रीकृष्ण मच्छिंद्र शिंदे रा. घोटी ता. करमाळा जिल्हा सोलापूर यांची करमाळा तालुका सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली, जोतीराम अनंतराव काळे रा. साडे ता करमाळा जिल्हा सोलापूर यांची उप तालुकाप्रमुख ,साडे-केम जिल्हा परिषद गट या पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी नवनाथ गुंड तालुका प्रमुख करमाळा व पांडुरंग लोखंडे करमाळा तालुका समन्वयक यावेळी उपस्थित होते. यावेळी सुरज वसंत काळे यांची विभागीय सचिव पश्चिम महाराष्ट्र या पदावरून राष्ट्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष या पदावर पदोन्नती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
close