प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : २४ / चांद्रयान ३ मोहिम २३ ऑगस्ट ला यशस्वी झाली . आणि संपुर्ण भारत देशात हा आनंद मोठ्या उत्साहात मिठाई वाटप करून . फटाक्यांची आतिष बाजी करत साजरा करण्यात आला. नगर शहर येथे सर्व नागरिकांनी आनंद व्यक्त केला .
चांद्रयान-२च्या अपयशानंतर खचून न जाता, इस्रोनं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करण्यासाठी पुन्हा मोहीम हाती घेतली आणि १४ जुलैला चांद्रयान-३ अवकाशात झेपावले. आज भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे.
ही मोहीम सफल बनवण्यासाठी राबणाऱ्या सर्व शास्त्रज्ञांचे आभार आणि अभिनंदन .
नगर येथे चांद्रयान ३ यशस्वीतेचा जल्लोष साजरा करताना भाजपा प्रभारी पक्ष निरीक्षक नवनाथजी साहेब, भाजपा शहरजिल्हा अध्यक्ष अभयजी आगरकर ,व सर्व भारतीय जनता पार्टी चे पधादिकारी , कार्यकर्ते दिसत आहेत .

