*चांद्रयान -3 द्वारे भारताची अंतराळ क्षेत्रात विक्रमी कामगिरी- राजवर्धन पाटील*
इंदापूर प्रतिनिधी:
भारताने आज चांद्रयान -3 च्या माध्यमातून चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याने अंतराळ क्षेत्रात विक्रमी कामगिरी केली असून यामुळे भारतीयांचा आनंद द्विगुणित झाल्याचे मत निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोअर कमिटी प्रमुख राजवर्धन पाटील यांनी म्हटले.
दूधगंगा येथे सहकाऱ्यांबरोबर राजवर्धन पाटील यांनी चांद्रयान-3 मोहिमेचे थेट प्रक्षेपण पाहिले.
राजवर्धन पाटील म्हणाले की ,'
सर्व भारतीयांचा अभिमान उंचावणारी आणि सर्व भारतीयांना प्रेरणा देणारा हा प्रसंग आहे यामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या प्रगतीसाठी आखलेल्या योजना आणि सर्व शास्त्रज्ञांचे अथक प्रयत्नाने हे यश संपादन करता आले.सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन.'

