shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे पार पडल्या तालुका स्तरीय योगस्पर्धा.

*इंदापूर येथे पार पडल्या तालुका स्तरीय योगस्पर्धा.*
 
इंदापूर प्रतिनिधी: आज येथील इंदापूर तालुका क्रिडा संकुल या ठिकाणी पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने योगासन स्पर्धचे आयोजन केले होते या स्पर्धमध्ये 14 वर्ष मुले व मुली आणि 17 व 19 वर्ष मुले व मुली अशा वयोगटातील सुमारे ७० मुलामुलींनी उस्फुर्त सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पतंजलि योग समिती इंदापूरचे युवा प्रभारी  सचिन पवार व हमीदभाई आत्तार उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष इंदापूर तालुका क्रिडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व योग शिक्षक  शरद झोळ होते.
या स्पर्धमध्ये प्रत्येक गटामधून पाच स्पर्धंकांची निवड जिल्हा स्पर्धकरीता करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  शरद झोळ यांनी रोजच्या  योगासन प्राणायाम याचे महत्त्व सांगितले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श् सचिन पवार यांनी व्यायामाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले व हमीद आत्तार यांनी खेळाडूंना स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी
पंच म्हणून  राजाभाऊ सोनमाळी , नितीन बांगर  ,राजेंद्र जगताप,  वैभव मारकड यांनी काम पाहिले या स्पर्धकरीता विविध शाळेतील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सदाशिव सावंत सौ .तेजस्विनी माने, अमोल काळे ,अशोक करे, सागर नरळे, दादा चिंचकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य केले.
close