shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चांद्रयान-3 च्या यशस्वीतेमुळे अंतराळातील महाशक्ती देश म्हणून जगात भारताची नवीन ओळख - हर्षवर्धन पाटील

*चांद्रयान-3 च्या यशस्वीतेमुळे अंतराळातील महाशक्ती देश म्हणून जगात भारताची नवीन ओळख - हर्षवर्धन पाटील
   इंदापूर प्रतिनिधी;भारताने आज चांद्रयान -3 च्या माध्यमातून इतिहास घडवत जगात भारताची अंतराळातील महाशक्ती देश म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनात्मक  दूरदृष्टीकोनामुळे  तसेच शास्त्रज्ञाच्या अथक प्रत्नामुळे चांद्रयान-3 चा यशस्वी टप्पा आज संपूर्ण भारतवासी यांच्या साक्षीने पूर्ण झाला याचा मला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
   भारताचे चांद्रयान-3 आज चंद्रावर उतरणार होते या पार्श्वभूमीवर जगासह संपूर्ण भारत देशाच्या नजरा याकडे लागल्या होत्या. थेट प्रक्षेपणाद्वारे हे मिशन पाहण्याचा अनुभव भारतीयांनी घेतला .
  आज राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी याचे थेट प्रक्षेपण पाहिले. चांद्रयान -3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी संवाद साधला. 
   हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' चांद्रयान-3 च्या यशस्वीमुळे आंतराळातील महाशक्ती देश म्हणून जगात भारताची नवीन ओळख निर्माण झाली आहे. भारतीय विज्ञान , इंजीनियरिंग , औद्योगिक आणि उद्योगासाठी हे मिशन मैलाचा दगड ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इस्त्रोने सर्वाकृष्ठ कामगिरी केली आहे.
close