*बांडेवाडी शाळेतील मुलांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप.*
इंदापूर प्रतिनिधी: दि २२ महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे वाढदिवसानिमित्त कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याचे संचालक था पळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भुषण काळे यांचे वतीने शाळा व अंगणवाडीतील सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शुभेच्छा दिल्या.भुषण काळे यांनी बोलताना आलेय परिसर , गुणवत्ता विविध उपक्रम कौतुक केले. सरपंच अजिनाथ पवार यांनी शाळेस सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पळसदेव ग्रामपंचायतीचे सरपंच अजिनाथ पवार , माजी सरपंच भालचंद्र बांडे , सदस्य महेंद्र काळे , विकास शिंदे , मधुकर रंधवे , पळसनाथ हायस्कूलचे प्राचार्य बाळू काळे सतिष काळे दै सकाळचे पत्रकार सचिन लोंढे, सीवायडीए समन्वयक किरण यादव उपस्थित होते. शाळेच्या वतीने शाळा समिती अध्यक्ष बापू राहिगुडे यांनी सर्वाचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. प्रसंगी शिक्षिका ललिता वाघमोडे , अंगणवाडी सेविका सुनंदा पोंदकुले , उर्मिला बांडे उपस्थित होत्या सुत्रसंचालन मुख्याध्यापक संतोष हेगडे यांनी केले व आभार पळसनाथ विद्यालयाचे शिक्षक संतोष पवार यांन मानले.

