प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २३ / अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर येथील महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षक संचालक आदरणीय प्रा. सुनिल लक्ष्मण जाधव हे नियम वयोमानानुसार शुक्रवार दि . ३१/०८/२०२३ रोजी ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव समारंभ महाविद्यालयामध्ये शनिवार दि . २६/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. संपन्न होत आहे .
याप्रसंगी प्रा. डॉ. संजीव सोनवणे कुलगुरु, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे अध्यक्ष मा.आ.श्री. नंदकुमार झावरे पाटील , उपाध्यक्ष श्री. रामचंद्रजी दरे , सचिव जी .डी . खानदेशे यांच्या शुभहस्ते हा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न होणार आहे .
या प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विवेक भापकर , डॉ. मोहनराव हापसे, डॉ. चंद्रकांत मोरे , अॅड. अभय आगरकर , श्री. जयंतराव वाघ , पालघरचे एसीपी श्री. पंकज शिरसाठ तसेच, मा. अॅड. विश्वासराव आठरे पाटील , मा. श्री. सिताराम खिलारी , मा. अॅड. दिपलक्ष्मी म्हसे , श्री. मुकेश मुळे यांची उपस्थिती राहणार असून सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी वर्ग व कॉलेजचे विद्यार्थीही उपस्थित
राहणार असल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य एम एम तांबे यांनी दिली आहे .

