shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या केज तालुकाध्यक्ष पदी विजय आरकडे!!

प्रकाश मुंडे  / बीड जिल्हा प्रतिनिधी:-

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर, किरण नाईक सर,राज्याध्यक्ष शरद पाबले सर यांच्या आदेशावरून बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी केज तालुका अध्यक्ष पदी विजय अरकडे यांची निवड जाहीर केली.ही नियुक्ती पुढील दोन वर्षासाठी राहील.         
        
मराठी पत्रकार परिषदेचे काम आधिक जोमाने व्हावे यासाठी विजय अरकडे जिल्हाध्यक्ष व केज  तालुक्याचे संपर्क जिल्हा उपाध्यक्ष यांच्याशी समन्वय ठेऊन काम करतील.त्याबरोबरच तालुका कार्याध्यक्ष,सर चिटणीस,कोष्याध्यक्ष पदाच्या निवडी जिल्हाध्यक्षांची मान्यता घेऊन करतील. तालुक्यात परिषद सदस्य संख्या वाढवून परिषदेचे नाव उज्वल करतील असा विश्वास जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके यांनी व्यक्त केला.


या निवडीबद्दल त्यांचे अधिस्वीकृती समितीचे सदस्य अनिल महाजन सोशल मीडिया राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे,विभागीय संघटक सुभाष चौरे,राज्य कार्यकारिणी सदस्य विलास डोळसे,जिल्हा कार्याध्यक्ष सतीश बियाणी,जिल्हा सरचिटणीस प्रा.राजेंद्र बरकसे,जिल्हा कोषाध्यक्ष छगन मुळे,हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमंत्रक दत्ता आंबेकर, समन्वयक अभिमन्यू घरत,जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे , दिलीप झगडे ,चंद्रकांत राजहंस , अविनाश कदम,जुनेद बागवान,सय्यद शाकेर,गौतम बचुटे, रामदास तपसे,संजय राणभरे,आदींनी आभिनंदण केले आहे.
close