shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पञकार हल्लाविरोधी कृती समितीच्या केज तालुका निमंत्रक पदी सुहास चिद्रवार तर समन्वयक पदी दशरथ चवरे यांची निवड!

प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

मराठी पत्रकार परिषद संलग्न हल्ला विरोधी कृती समितीच्या केज तालुका निमंत्रक पदी सुहास चिद्रवार यांची तर समन्वयक पदी दै हिंद जागृती चे केज तालुका प्रतिनिधी दशरथ चवरे यांची निवड बीड जिल्हा हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक दत्तात्रय अंबेकर व बीड जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत यांनी  केली आहे, 
    
 

निवडीबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस .एम.देशमुख, किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे,मराठी पत्रकार परीषेदेचे माजी सरचिटणीस तथा अधिस्वीकृती समितीचे विभागीय सदस्य अनिल महाजन , दतात्रय अंबेकर , अभिमन्यू घरत ,सुभाष चौरे, विशाल सोळुंके व मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व वरिष्ठांसह , केज तालुक्यातील पत्रकार , राजकीय , सामाजिक , वकील , व्यापारी , वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत  

===========================
पत्रकारांच्या हितासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार असून तालुक्यातील पत्रकारांच्या अडचणीत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू अशी ग्वाही नवनिर्वाचित दोन्ही पदाधिकाऱ्यांनी निवडीला उत्तर देताना यावेळी दिली.
close