shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

"विकास की नींव मुंदडा परिवार" या पुस्तकाचे प्रकाशन ताई महोत्सवात मुंदडा कुटुंबीयांना पुस्तक प्रधान!!

                      
प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-                     केज विधानसभा मतदारसंघात राजकारण असो की समाजकारण मुंदडा कुटुंबीयांची काम करण्याची पद्धत वेगळी असल्याने जनसामान्याशी मुंदडा कुटुंबियांची नाळ जोडलेली आहे. 
केज विधानसभा मतदारसंघात मुंदडा कुटुंबीयावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून ती वेगळीच आहे. लाडेगाव येथील विद्यार्थिनी साक्षी शंकर मुळे ही सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी .साक्षी सध्या बारावीचे शिक्षण घेत असून नुकतेच तिने केज विधानसभा  मतदारसंघाच्या भाग्यविधात्या  लोकनेत्या स्वर्गीय विमलताई मुंदडा माजी आरोग्यमंत्री व केज विधानसभा  मतदार संघाच्या विद्यमान लोकप्रिय आमदार सौ. नमिता अक्षय मुंदडा यांच्या जीवन चरित्रावर पुस्तकाचे लिखाण करून  विमल ताई च्या राजकीय जीवनाची  पुन्हा एकदा आठवण करून दिली आहे. साक्षी मुळे या विद्यार्थिनींनी तीन पुस्तकाचे लिखाण करून प्रकाशित केली आहेत.                      

20 सांझा संकल येथे स्वतः चे लेख, कविता प्रकाशित केल्या आहेत. यामध्ये साक्षीचे पहिले पुस्तक "रुह-ए-कलम" दिल्ली येथे प्रकाशित झाले. दुसरे पुस्तक "खोए- हुए -बाब" बिदर येथे व तिसरे पुस्तक " विकास की नींव मुंदडा परिवार " हे पुस्तक दिल्ली येथे प्रकाशित करण्यात आले आहे.                           
 
विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ताई महोत्सव या कार्यक्रमात  "विकास की नींव मुंदडा परिवार" हे पुस्तक मुंदडा  कुटुंबीयांना प्रदान करण्यात आले. यावेळी केज विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार नमिता मुंदडा, युवा नेते अक्षय भैया मुंदडा ,जेष्ठ नेते व समाजसेवक नंदकिशोर काकाजी मुंदडा, माजी नगराध्यक्ष महादु मस्के, केज भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार, केज बाजार समितीचे उपसभापती डॉक्टर वासुदेव नेहरकर ,डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चिक्षे व अनंत आरसुडे उपस्थित होते . अत्यंत कमी वयात साक्षी मुळे या विद्यार्थिनींने "विकास की नींव मुंदडा परिवार " या पुस्तकाचे लेखन सुंदर पद्धतीने करून मुंदडा कुटुंबियांच्या राजकीय व सामाजिक जीवनावर प्रकाश टाकला आहे व पुस्तक प्रकाशित केले आहे . तिच्या या लिखाणाचे केज विधानसभेच्या लोकप्रिय आमदार नमिता मुंदडा व उपस्थित मान्यवरांनी तोंड भरून कौतुक केले आहे.
close