shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

न्यू लॉ कॉलेज येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा गौरव संपन्न ...


आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत न्यू लॉ कॉलेजचा कौतुकास्पद उपक्रम

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १९ /  अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यु लॉ कॉलेज अहमदनगर आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्य सैनिक कै . छबुराव सदावर्ते यांच्या सन्मानार्थ यांचे कुटुंबिय श्री .  प्रशांत सदावर्ते यांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य एम . एम . तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा . व्ही . ई . शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला . 

यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . तर प्रा . शिंदे सर यांनी देशभक्ती पर भाषण करून  सर्वांना मार्गदर्शन केले .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा .गिरिष हिरडे यांनी केले तर आभार प्रा . बी . डी .पांढरे यांनी व्यक्त केले .

याप्रसंगी प्रा सुनिल जाधव , प्रा . डॉ . अतुल मोरे सर , प्रा . आर . बी . दुसुंगे , प्रा . भवाळ सर , प्रा . मते मॅडम , प्रा . सांगळे मॅडम , प्रा .खुळे मॅडम ,प्रा . वड्डेपल्ली मॅडम , प्रा .भांबर्से मॅडम , पी .सी .म्हस्के ,  तसेच कानवडे सर , म्हस्के सर , बारगळ मॅडम , महेश केदार , नारायण पाखरे , बाळासाहेब शिंदे , आप्पा दाते आणि कॉलेजचे सर्व विद्यार्थी  उपस्थित होते .
close