shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


मोर्शी - 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त युवा एकता कला मंच बहुउद्देशीय संस्था मोर्शी व उपजिल्हा रुग्णालय मोर्शी तसेच पोलीस स्टेशन मोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

           रक्तदान शिबिर मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये घेऊन 151 रक्तदात्यांनी रक्तदान करून उच्चांक गाठला. यावेळी मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रमोद पोतदार, तहसीलदार सागर ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.निलेश पांडे, पोलीस निरीक्षक श्री.श्रीराम लंबाडे उपस्थित होते. 
          मोर्शी पोलीस स्टेशन मधून पोलीस कर्मचाऱ्यांनी व मोर्शीतील नागरिकांनी तसेच उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी डॉ.पंकज मुळे, मनीष अग्रवाल, आशिष पाटील, रितेश कुकडे,नवशात,वसीम शेख, युसुफ शेख,सचिन इंगळे,विकार अहमद,आशिष नेरकर,जयश्री मोरे,भास्कर चरणे,बबलू शेख,गौतम लोणारे,राहुल बोरकुटे,सागर माडोकार,स्वाती बुरंगे, पूर्वा मनवर,पूनम लगडे, विनय शेलुरे यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले...
close