प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २१/ करमाळा तालुक्यातील बिटरगाव श्री येथील एका शेतकऱ्याला रोजगार हमी योजनेतून विहीर मंजूर झाली. सबंधित शेतकऱ्याचे क्षेत्र हे सिना नदीच्या कडेला आहे. त्याच्या क्षेत्रात त्याला विहीर घ्यायची आहे. मात्र तांत्रिक अधिकारी विवेकानंद फाळके हे तेथे विहीर घेता येत नाही असे सांगत आहेत. याबाबत त्यांना लेखी आदेश मागवला मात्र त्यांनी त्याची पूर्तता केलेली नाही. हा प्रकार प्रभारी गटविकास अधिकारी भोंग यांना सांगण्यात आला. मात्र त्यानीही यामध्ये ठोस निर्णय घेतला नाही.
दरम्यान आज (सोमवारी) फाळके आणि भोंग यांनी एक पत्र सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘सिंचन विहीर खोदकामासाठी निश्चित केलेली जागा स्वतच्या मालकीची आहे. परंतु सदरील जागी सिना नदीच्या पाणी प्रवाहमुळे ती जागा नदी पत्रात येते अशी सरकार निर्णयात कोणत्याही सूचना नाहीत. असे असताना फाळके यांनी विहीर कोणत्या नियमांच्या आधारे आडवली आहे हा खरा प्रश्न आहे.
लाभार्थीचे क्षेत्र नदीच्या कडेला आहे हा शेतकऱ्याचा गुन्हा आहे का? अधिकार दिला म्हणून फाळके सारख्या अधिकाऱ्याने त्याचा दुरुपयोग करून अडवणूक करणे हे योग्य आहे का? हा प्रश्न आहे. आणि गटविकास अधिकारी भोंग हे फक्त करगदावर सहीच करतात की बाकी वस्तुस्थिती पाहतात? हा प्रश्न निर्माण होत आहे. फाळके यांनी यापूर्वी अनेक विहिरी बेकायदा केल्या त्याचे पुरावे आहेत.
असे असताना बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सबंधित पत्रकाराला मोबाईलवर स्टेट्स ठेऊन बदनाम करत आहेत. त्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यामध्ये सबंधित जबाबदार अधिकाऱ्यानी यामध्ये लक्ष घालून फाळकेला समज द्यावी आणि ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी आडवल्या आहेत त्यांना त्या विहिरी खोदण्यास मदत करावी.

