शिर्डी एक्स्प्रेस प्रतिनिधी : मौजे तिखी येथे डॉ. शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील कृषीकन्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत तिखीसमोर रांगोळीने गावचा नकाशा रेखाटला. याप्रसंगी बहुसंख्येने जमलेल्या गावकऱ्यांनी कृषीकन्यांचे कौतुक केले.
याच कार्यक्रमामध्ये कृषीकन्यांमार्फत विवध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले .त्यामध्ये गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिखी मध्ये इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा व विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले .तसेच विजेत्यांना कृषीकन्या कु. वैष्णवी गायकवाड, अपेक्षा हरगुडे, आरती जाधव, तेजस्विनी मारकड, वर्षा पांढरे, शिवांजली रणवरे, मंगल दिवटे यांच्याकडून बक्षीसे देण्यात आली.

