वालचंदनगर येथील कामगारांच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास सहकार सेना शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा.
इंदापूर प्रतिनिधी: वालचंद इंडस्ट्रीज कंपनी वालचंदनगर ता. इंदापूर जि. पुणे येथील कामगारांनी थकीत पगारासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणास पाठिंबा देताना सहकार सेना शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव सुरज काळे, तालुकाप्रमुख अनिल कदम , उपजिल्हाप्रमुख प्रकाश शेळके ,उप तालुकाप्रमुख अभिमन्यू टकले, उप तालुकाप्रमुख
गजानन चौगुले, उपतालुकाप्रमुख योगेश मिसाळ,
उपतालुकाप्रमुख अजिंक्य रणमोडे ,
इत्यादींच्या उपस्थिती एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास सहकार सेनेच्या वतीने पाठिंबा दिला व उपोषणकर्त्यांच्या अडचणी बाबत चर्चा करून त्यांच्या अडचणी संदर्भात मा.खासदार आनंदराव अडसूळ यांना फोन करून सविस्तर माहिती देऊन युनियनच्या प्रमुखांची चर्चा फोन द्वारे घडवून दिली व लवकरच उपोषणकर्त्यांच्या मागणीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली जाणार आहे व शिवसेनेच्या वतीने कामगार नेते म्हणून अडसूळ साहेब योग्य मार्ग काढतील व वालचंद इंडस्ट्रीज कंपनीच्या कामगारांना न्याय मिळेल पर्यंत शिवसेना सदैव त्यांच्या पाठीशी राहील असे आवाहन सुरज काळे यांनी दिल्याचे सांगितले.

