shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

७७ व्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने व लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी '25 ' व "L . S . P .V. " रचना करत स्वातंत्र्य दिन साजरा केला*


७७ व्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने व लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त  विद्यार्थ्यांनी '25 ' व "L . S . P .V. " रचना करत स्वातंत्र्य दिन साजरा केला*

        इंदापूर प्रतिनिधी: भारताच्या "७७" व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बोराटवाडीचे प्रतिष्ठित नागरिक  पोपट सुद्रिक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नीरा भिमाचे संचालक व बोराटवाडी गावचे सरपंच  दत्तूअण्णा सवासे,  दूधगंगा चे संचालक 
दयानंद गायकवाड  , कृष्णा बोराडे , तुकाराम बर्गे,  लालासो हेगडकर,  भारत काळकुटे, मेजर .धन्यकुमार माने, भीमराव फाळके ,.संजय गायकवाड, .भिमराव गायकवाड रघुनाथ सवासे, .राजीव भाळे ,.राहूल रूपनवर, विनोद सावंत.रमेश बोराडे,  .संजय गायकवाड, .सचिन हेगडकर,.भारत मारकड , .सुखदेव निकम,, .भाऊ सवासे, .सचिन हेगडकर ,.दीपक पवार,.बाबुराव फडतरे इ.ग्रामस्थ, तरुण वर्ग व विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.  
 
       क्रीडा शिक्षक  सदाशिव सावंत  व . भीमराव खाडे  यांच्या मार्गदर्शनाखाली इ.9 वी व इ.10 वी तील विद्यार्थ्यांनी ध्वजाला मानवंदना दिली.*
            यावेळी विद्यालयास मदत केल्याबद्दल  राहुल रुपनवर,  विनोद सावंत श्री युवराज इंगवले* यांचा सत्कार करण्यात आला.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य  भिमराव आवारे सर यांनी केले. ग्रामस्थांमधून  कृष्णा बोराडे,  दयानंद गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
    सालाबादप्रमाणे यंदाही विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीमेवरील सैनिकांसाठी "एक धागा कृतज्ञतेचा" या उपक्रमांतर्गत स्वतः बनविलेल्या राखी व शुभेच्छा पत्रे माजी सैनिक  धन्यकुमार माने यांच्या कडे सुपूर्त केली.
      इ. 10 वी , इ.12 वी मध्ये विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अमर निलाखे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले.*

close