शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन):
न्याहाळोद येथील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण मंडळचे नूतन विद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संप्पन्न झाला .
न्याहळोद येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम येथील नूतन विद्यालय येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त महारूदाजी बारकू भील यांना देण्यात आले ध्वजारोहण कार्यक्रम संस्थेचे संचालक विजू रायते यांचे पुतणे माजी सैनिक चंद्रशेखर रायते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त सरपंच कविता वाघ, उपसरपंच निलेश माळी, संस्थेचे विश्वस्थ माजी सरपंच कैलास पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष भास्कर माळी, संचालक देविदास जिरे, विजूआप्पा पवार , चांदखा पठाण, अमृतआबा पवार, माजी उपसरपंच भैया कढरे, आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

