स्वातंत्र्यदिनानिमित्त कृषि दूतानी रांगोळीने रेखाटलेला रवळगाव गावचा नकाशा ठरला गावकऱ्यांचे आकर्षण !
इंदापूर प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनानिमित्त कृषि दूतानी रांगोळीने रेखाटलेला रवळगाव गावचा नकाशा गावकऱ्यांचे आकर्षण ठरला.
महाविद्यालय, बारामती येथील कृषि दूतानी स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायत रवळगाव समोर रांगोळीने गावचा नकाशा रेखाटला.याप्रसंगी बहुसंख्येने जमलेल्या गावकऱ्यांनी कृषि दूतांचे कौतुक केले.
याच कार्यक्रमामध्ये कृषि दूतानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रवळगाव मध्ये इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा व भाषण स्पर्धा घेण्यात आली. तसेच विजेत्यांना कृषि दूत नितांत भोसले,अभिलाष चव्हाण, तेजस घुमरे, रोहन जमादार, वीरेंद्र काकडे, प्रणव मुंडे, वैभव राऊत यांच्याकडून बक्षीसे देण्यात आली.

