shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुकडी धरणाचे पाणी भोसे तलावात सोडावे ; शंभूराजे जगताप यांची प्रशासनाकडे मागणी


प्रतिनिधी: सुर्यकांत होनप 

करमाळा: दि. २०/ करमाळा तालुक्यातील भोसे येथील तलावात कुकडीचे पाणी सोडण्यात यावे कारण चालू वर्षी पावसाचे प्रमाण खूप कमी आहे.

 या भागात पाऊस खूपच कमी पडला असून पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके जळून चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. तरी त्या तलावात शेतीपंपासाठी व पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे. या तलावातील पाण्याचा फायदा भोसे, रावगांव, हिवरवाडी या गावातील शेतीसाठी व पशु पक्ष्यासाठी होतो. या तलावात पाणी सोडण्याची खूप गरज आहे. सध्या कुकडी प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे. या मागणीचा विचार करून वेळीच पाणी सोडण्यात यावे अशी विनंती करणारे निवेदन शंभूराजे जगताप यांनी आमदार, खासदार, कुकडीचे कार्यकारी अभियंता व जलसंपदा मंत्री यांच्याकडे दिले आहे.

 संबंधित लोक प्रतिनिधी व अधिकारी म्हणून सर्वांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही विनंती जगताप गटाचे युवा नेते तथा खरेदी – विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी केली आहे.
close