shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री छत्रपती महाविद्यालयात 'मेरी मिठी मेरा देश' अंतर्गत पंचप्रण शपथ

श्री छत्रपती महाविद्यालयात 'मेरी मिठी मेरा देश' अंतर्गत पंचप्रण शपथ
       इंदापूर प्रतिनिधी:,
श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे, श्री.छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर,आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "मेरी मिठी  मेरा देश" या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रांतिदिना निमित्त प्राचार्य डॉ.प्रकाश पांढरमिसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्ताने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण प्राचार्य डॉ.प्रकाश पांढरमिसे यांच्या उपस्थित प्राध्यापक व विध्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विध्यार्थ्यांना विध्यार्थी विकास अधिकारी प्रा धुळदेव वाघमोडे यांनी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व इतर सहकारी यांना पंचप्रण पाळण्याची शपथ देण्यात आली. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे , उपप्राचार्य. डॉ. संजय मोरे, , वाणिज्य शाखा प्रमुख. प्रा योगिता तरंगे ,कला शाखा प्रमुख ,प्रा.शिवाली माने-देशमुख इतर सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी,कार्यालयीन अधीक्षक सुशील निंबाळकर उपस्थित होते.
            राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बाबासाहेब चव्हाण  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आभार ग्रंथापाल प्रा. सोनाली वाघमारे यांनी मानले.
close