स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा गौरव अविस्मरणीय
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २१ / अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यु लॉ कॉलेज अहमदनगर , राष्ट्रीय सेवा योजना , विद्यार्थी विकास मंडळ , सावित्रीबाई फूले पूणे विद्यापीठ पुणे , यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव न्यू लॉ कॉलेज येथे सोमवार दि . २१ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. "मिट्टी को नमन , विरोंको वंदन" या अभियाना अंतर्गत महाविद्यालयात स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचा गौरव समारंभ साजरा करण्यात आला.
या गौरव समारंभात थोर स्वातंत्र्य सैनिक मा . डॉ . रविंद्र कवडे यांचा सत्कार प्राचार्य एम .एम . तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. जागतिक कुस्ती मधे त्यांना सुवर्ण पदक मिळाले आहे . तसेच मा . देवेंद्र कवडे , अभिनंदन वाळके यांचाही सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य सैनिक कै . लक्ष्मणराव चव्हाण यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी त्यांची कन्या सुनंदा भोर , वसंतराव भोर व नातु शुभम भोर यांचा तसेच स्वातंत्र्य सैनिक कै. छबुराव सदावर्ते यांचे कुटुंबिय प्रशांत सदावर्ते आणि भाग्यश्री सदावर्ते यांचाही सत्कार करण्यात आला.
प्राचार्य तांबे सर यांनी देशभक्तीपर विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले . तसेच मा . रविंद्र कवडे हे खुप मोठे कुस्तीपटु असुन ते सुवर्ण पदक विजेते आहेत तसेच उत्तम कुस्ती पंच म्हणून ही त्यांनी कार्यकिर्द गाजविली असून नगर जिल्हा आणि जिल्ह्या बाहेरही अनेक कुस्तीपटु तयार केल्याचे त्यांनी प्रामुख्याने सांगितले .
यावेळी मा . रविंद्र कवडे यांनी सर्व उपस्थितांना त्यांच्या काळातील आठवणींच्या शिदोरीची माहिती अलगद उलगडून दिली . त्यांचे अनेक अनुभव सर्वांना सांगितले . त्यांच्या देशभक्तीपर विचारांनी सर्व उपस्थित भारावुन गेले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम .एम . तांबे यांनी केले . आभार प्रा. आर . बी . दुसुंगे यांनी मानले तर प्रा. गिरिष हिरडे यांनी उत्तम सुत्रसंचालन केले .
याप्रसंगी प्रा. सुनिल जाधव , प्रा . डॉ . अतुल मोरे , प्रा . भवाळ , प्रा. पांढरे , प्रा. डी बी .मोरे , प्रा .खूळे मॅडम , प्रा . वडडेपल्ली मॅडम , प्रा . मते मॅडम , प्रा . सांगळे मॅडम , प्रा . भांबर्से मॅडम , तसेच कानवडे सर , म्हस्के सर , बारगळ मॅडम , महेश केदार , राकेश बोगा , नारायण पाखरे , बाळासाहेब शिंदे , आप्पा दाते आणि कॉलेजचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते .

