श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील आर.बी.एन.बी.(रावबहादूर नारायणराव बोरावके) महाविद्यालय आणी सी.डी.जैन (चंद्ररुप डाकले जैन) महाविद्यालय कॉलेज ऑफ कॉमर्स या दोन्ही महाविद्यालयात फी भरण्यासाठीची वेळ ही सकाळी साडे दहा ते दुपारी दोन वाजे पर्यंत असते. यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण निर्माण असून करीता महाविद्यालय सुरू असे पर्यंत शुल्क भरण्याचे विभाग चालू ठेवावे अशा निवेदन विद्रोही विद्यार्थी संघटनेच्या वतीने दोन्ही महाविद्यालय प्रशासनास देण्यात आले. याप्रसंगी आकाश पंडित, शुभम वायळ, स्नेहल जगताप, दिपाली सोनवणे, अजय राजपूत, प्रथमेश मोरे,अमोल सोनवणे, अश्फाक शेख आदी. विद्यार्थी उपस्थित होते.
सदरील प्रश्नी महाविद्यालय प्रशासनाशी चर्चा झाली असता विद्यार्थ्यांनी सांगितले की महाविद्यालयाने दिलेले करणे ही खूप छोटी आहेत.संस्थेची पतसंस्था आहे तेथे पैसे भरायची असतात, दुपार नंतर पतसंस्थेत भरणा घेतला जात नाही,जर महाविद्यालय प्रशासनाने सदरील विद्यार्थ्यांची फी ची रक्कम स्विकारली जरी तरी मग घेतलेलं पैसे ठेवायची कुठं ?, त्याची जवाबदारी कोण घेणार ? अशी उत्तरे मिळाली आहेत.
मात्र महाविद्यालय प्रशासनाने ती रक्कम दुसऱ्या दिवशी भरावी किंवा मग सायंकाळी पतसंस्थेने रक्कम स्विकारावी अशी काही तरी तरतुद निर्माण करुन विद्यार्थ्यांची आडचण ही दुर केली पाहिजे कारण सदरील पतसंस्था ही संस्थेतीच असल्याने का शक्य होवू शकणार नाही ?, अशा प्रकारे महाविद्यालय प्रशासनाच्या समस्यांना उपाय आम्ही सुचवणार आहोत. अन् तरी देखील आमची मागणी मान्य नाही झाल्यास आम्हाला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असेही यावेळी विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे.
या निवेदनावर स्नेहल जगताप, दिपाली सोनवणे,अकाश पंडित,शुभम वायाळ, प्रथमेश मोरे, अश्फाक शेख, अमोल सोनवणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111

