*रस्ता दुरुस्त व्हावा याकरीता खा.सदाशिव लोखंडे यांना निवेदन
*बी.आर.चेडे - शिरसगांव
हरेगावं ते खैरी आणी उंदिरगाव ते खानापूर रस्त्याची सध्या अतिशय दुरावस्था झाली आहे, या रस्त्यांवर वाहने चालवणे तर दुरच पायी चालणे देखील जिकरीचे ठरत आहे.
या दोन्ही रस्त्याच्या दुरुस्ती कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार.सदाशिव लोखंडे यांना उंदिरगाव ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आले,
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य .बाळासाहेब नाईक, अशोक सह.साखर कारखान्याचे संचालक विरेश गलांडे, बाजार समितीचे माजी उपसभापती नितीन भागडे ,लोकनियुक्त सरपंच सुभाष बोधक, वळदगांव चे माजी सरपंच, रामराव शेटे विजय भवार, सोसाटीचे संचालक सुभाष शिंदे, अजय गाडेकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

