प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ८/ आदरणीय अ़ॅड. बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट येथे दि. ७/८/२०२३ रोजी वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला रेकॉर्ड ब्रेक असा जनसमुदाय जमला होता. साहेबांचे मार्गदर्शन, वंचित समूहाचा बुलंद आवाज व मार्गदर्शन ऐकण्यासाठी अफाट गर्दी झाली होती. या सभेच्या माध्यमातून असे वाटत होते की देशात आणि राज्यात भयंकर वादळ निर्माण होणार आहे. त्या वादळाचे नाव अ़ॅड. बाळासाहेब आंबेडकर आहे असे मत वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी व्यक्त केले.
परिवर्तनाची सुरवात झाली. भाजप सरकारच्या सर्व उतरती कळा लागली. जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज आहे हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध होते असेही वाघमारे म्हणाले. या साधी राहणी, उच्च विचार, परखड व्यक्ती मत्व, जणमाणसाला खांद्यावर हात ठेवून आपुलकीने चौकशी करणार्या, असेल त्या पाश्र्वभूमीवर सखोल अभ्यास करणारे व माज्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यांला ही योग्य मार्ग दाखवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ़ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या समवेत बसण्याचा योग आला व भाग्य लाभले असे मत वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी व्यक्त केले.

