shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषी उपसंचालक वर्ग १ (डेप्युटी डायरेक्टर आॅफ अँग्रीकल्चर) पदी शिल्पा संभाजी मारकड शेंडगे*

*कृषी उपसंचालक वर्ग १ (डेप्युटी डायरेक्टर आॅफ अँग्रीकल्चर) पदी शिल्पा संभाजी मारकड शेंडगे*

*एन.टी-सी महिलांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम*
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या  परीक्षेमध्ये शिल्पा संभाजी मारकड शेंडगे यांची उपसंचालक (कृषी) वर्ग १  पदी नुकतीच निवड झाली आहे , त्या एन.टी.-सी महिला मधून महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या आल्या आहेत सदर निवडीनंतर शरयु फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला  पवार ,आमदार दत्तात्रय भरणे ,आमदार यशवंत माने, मा. सभापती प्रविण माने , टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी जाधव , अँड सचिन वाघ , फिरोजभाई पठाण यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शिल्पा यांचे  प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रूई येथे झाले तर ५ वी ते १० पर्यंतचे शिक्षण श्री बाबीर विद्यालय रूई येथे झाले,११ वी १२ वी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती येथे तर  बी एस्सीअॅग्री पदवीचे शिक्षण काॅलेज आॅफ अँग्रीकल्चर फलटण येथे झाले   आहे , त्या रूई बाबीर येथुन ग्रामीण भागातील असल्या तरीदेखील शिल्पा संभाजी मारकड यांचे माहेर व सासरकडील कुटुंबीय उच्चशिक्षित असुन 
वडिल संभाजी मारकड पशुवैद्यकीय डाॅक्टर , आई विजया यांचे बी एस्सी चे शिक्षण चुलते सर्जेराव मारकड प्राथमिक शिक्षक आहेत तर
 भाऊ अमरसिंह  मारकड वकिल असुन प्रशांत पशुवैद्यकीय डाॅक्टरकीचे शिक्षण घेत आहे ,  बहिण तृप्ती हीअभियांत्रिकी शिक्षित असुन,  सुप्रिया हीचे बी एस्सीअॅग्री पर्यंत शिक्षण झालेलं असुन भाग्यश्री फार्मसी चे शिक्षण घेत आहे तर भाऊजयी सुप्रिया अमरसिंह मारकड देखील वकीली व्यवसाय करीत असुन रूई ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच आहेत .यासोबतच सासरकडील कुटुंबातील सासरे बाळासाहेब शेंडगे हे सिंचन भवन जलसंपदा विभाग,पुणे‌ येथे अधिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत, तर पती अभिजीत शेंडगे प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत तर दीर निखील शेंडगे देखील खाजगी कंपनीत अभियंता आहेत. सदर मारकड यांचे निवडीमुळे त्यांचे नातेवाईक व मित्र परिवारामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे .रूई ग्रामस्थांच्या वतीने लवकरच भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात येणार आहे.
close