shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर-निमगावात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर-निमगावात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

महिला शिक्षिकांनी बांधली वृक्षाला राखी.
बावडा- ( *दि.३१*) आनंदराव पवार ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निरनिम गाव यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थी यांना विद्यार्थिनींनी राख्या बांधून तर महिला शिक्षिकांनी वृक्षाला राखी बांधून या शैक्षणिक संकुलात निसर्गाच्या सानिध्यात उत्साहपूर्ण, आनंदी वातावरणात राखी पौर्णिमा हा सण उत्साहात पार पडला.
बहिण भावाचे अतुट नाते अधिक दृढ करण्यासाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर निमगाव मध्ये प्रथम वृक्षांना राखी महिला शिक्षकांनी बांधली या कार्यक्रमासाठी  संस्थेचे अध्यक्ष दत्तामामा घोगरे, उपाध्यक्ष रणजित घोगरे,सचिव अजित घोगरे, मुख्याध्यपक पिसे सी.बी. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
 यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  काळे मॅडमने केल. अनुमोदन जोशी मॅडम व  आभार जगताप मॅडम ने केले उपस्थित प्रमुख पाहुणे सतिश वणवे व सर्व शिक्षक वृंद   यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात बालचमूने साजरा केला.



close