प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १० / करमाळा तालुक्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करमाळा तालुकास्तरीय योगासन स्पर्धेने महात्मा गांधी विद्यालय येथे क्रीडा स्पर्धेला सुरूवात झाली.
या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन महात्मा गांधी विद्यालयाचे विश्वस्त श्री शंभूराजे जयवंतराव जगताप (दादा) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री राजकुमार पाटील साहेब यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.
विस्तार अधिकारी श्री नलवडे साहेब, संस्थेचे प्राचार्य श्री कापले सर, उप मुख्याध्यापक श्री. बागवान सर, जेष्ठ पर्यवेक्षक श्री पाटील सर, पर्यवेक्षिका सौ. नवले मॅडम, ज्यु. कॉलेज विभाग प्रमुख श्री पवार सर, क्रीडा समन्वय श्री. मुकुंद साळुंखे सर, क्रीडा शिक्षक श्री. दळवे एस. बी., श्री बोळगे सर, श्री सागर शिरसकर, श्री ढेरे सर, श्री ठोसर सर, श्री काळे सर इत्यादी उपस्थित होते. सुत्रसंचालन श्री भागडे सर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री दळवे सर यांनी केले.

