shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कासोदा गावच्या कर्मचाऱ्यांना ना पगार ना सुविधा ; प्रचंड दुरावस्था


अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १० /   कासोदा गाव येथील त्रस्त सफाई कामगार व आठवडे बाजार दलित वस्ती येथील समस्या बाबत मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य  यांना नगर येथील अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेमार्फत ईमेल द्वारे निवेदन देण्यात आले आहे .

अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने सदर अर्जात सांगितले आहे की , ग्रामपंचायत कासोदा ता.एरंडोल जिल्हा जळगाव या ठिकाणी कासोदा ग्रामपंचायत मध्ये दलित वर्गातील सफाई कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कासोदा गावात पूर्ण ईमानदारी मेहनतीने व नियमितपणे गावातील स्वच्छता करून देखील ग्रामपंचायत मार्फत जाणून बुजून या कर्मचाऱ्यांचे दोन दोन वर्षे पगार थकवले जात आहेत . 

 या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या गावात आठवडे बाजार ही दलित वस्ती असून या वस्तीवर रोड, ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाणी, पथदिवे यापैकी कुठलेही प्रकारची सोयी सुविधा या दलित वस्तीवर ग्रामपंचायत कडून दिली जात नाही. शासनाकडून दलित वस्तीच्या सुधारणा साठी निधी येतो पण तो निधी कोणाचे घशात घातला जातो हा सर्वात मोठा प्रश्न येथील नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. सफाई कर्मचारी हा साऱ्या गावाची घाण उचलतो पण त्यानेच घाणीत राहिला पाहिजे का ?

 ग्रामपंचायतीतील ग्रामविकास अधिकारी व सरपंच जाणून बुजून या दलित वस्ती मध्ये कुठल्याही प्रकारची सोय सुविधा देत नाही. या सर्व गोष्टीची चौकशी होऊन ग्रामविकास अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून कडक कारवाई करण्यात यावी व गावातील जातीयवादी मुजोर सरपंचावर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नगर येथील अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे मा. श्री. सनीभैय्या खरारे आणि उपजिल्हाध्यक्ष मा. श्री. राहुल लखन ,जिल्हा सचिव विक्रम चौहान (सर),संतोष सारसर,सल्लागार प्रशांत पाटोळे,एडवोकेट सिद्धार्थ सोळंकी,सामाजिक कार्यकर्ते अभिषेक भगवाने,धीरज बैद,संजय खरे,पवन सेवक यांनी केली आहे .
close