shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय स्वातंत्र्य चळवळ चार विचारप्रवाहतून जाते -प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे

भारतीय स्वातंत्र्य चळवळ चार विचारप्रवाहतून जाते -प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे
इंदापूर प्रतिनिधी:
श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे,श्री छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात क्रांती दिन साजरा करण्यात आला. यावेळी सोनाली चव्हाण, मोनाली चव्हाण व तुकाराम गायकवाड या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. धुळदेव वाघमोडे यांनी मनोगते व्यक्त केली.
      कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते असे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास अभ्यासताना  भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही प्रामुख्याने मवाळअथवा नेमस्त विचारधारा ,जहालविचारधारा , गांधीवादीविचारधारा आणि क्रांतिकारी विचारधारा या चार  विचारधारांमधून जाते. ब्रिटिश  सत्तेला या देशातून कायमचे हद्दपार करण्यासाठी 08 ऑगस्ट रोजी ठराव करून 9 ऑगस्ट या दिवशी मुंबईच्या गवालिया टॅंक या मैदानावर  क्रांती करण्याचे ठरले व ब्रिटिश सत्तेविरुद्ध क्रांती घडवून आणली. 9 ऑगस्ट हा क्रांतीदिन म्हणून इतिहासात गणला गेला. या क्रांती दिनाच्या निमित्ताने क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे आत्मबलिदान दिले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या क्रांती दिनाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या क्रांतिकारकांचा इतिहास वाचला पाहिजे.असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी प्रा. सुवर्ण बनसोडे यांनी तर आभार कला शाखा प्रमुख-प्रा.शिवाली माने-देशमुख यांनी मानले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close