प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज आणि आंबेजोगाई शहरात विविध वस्त्यात राहणाऱ्या गोरगरीब नागरिकांना रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुले मिळवून देण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत .सदरील नागरिकांच्या घरांची त्वरित नगरपंचायत ,नगरपरिषद मध्ये नोंद घेण्याची कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी दोन्ही मुख्याधिकाऱ्यांना केल्या आहेत.
यासंदर्भात उपजिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर केज व आंबेजोगाई येथील मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने सर्वेक्षण सुरू केले आहे.
केज व आंबेजोगाई मध्ये घरकुल लाभार्थ्यांची संख्या नगण्य आहे. केज मधील क्रांती नगर सर्वे नं 100 व वडार वस्ती भागातील नागरिक वर्षानुवर्षे इथे राहत आहेत.
परंतु सदरील जागा गायरानामध्ये मोडत असल्यामुळे त्यांना घरकुल योजनेचा लाभ भेटत नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर आमदार नमिता मुंदडा यांनी या बाबीमध्ये लक्ष घालून उप जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन सदर घरकुल योजना ह्या लाभार्थ्यांना कशी भेटेल यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नगरपंचायत चे मुख्याधिकारी व कर्मचारी क्रांतीनगर, वडार वस्ती मध्ये सर्वे करत आहेत. या बैठकीस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर काकाजी मुंदडा ,उपजिल्हाधिकारी शरद झाडके,आंबेजोगाई चे तहसीलदार तरंगे , केज नगरपंचायत चे मुख्याधिकारी महेश गायकवाड, आंबेजोगाई चे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे, केजचे तहसीलदार अभिजीत जगताप , सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे, उपसभापती डॉक्टर वासुदेव नेहरकर, सुनील जगताप, महादेव सूर्यवंशी ,शेख ताहेर, जलील मौलाना आदींची बैठकीस उपस्थिती होती. दरम्यान आमदार नमिता मुंदडा यांच्या या भूमिकेचे केज व आंबेजोगाई शहरातून स्वागत होत आहे .
आमदार नमिता मुंडे यांच्या वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा ,महसूल विभाग ,नगरपरिषद ,नगरपंचायत यांच्या परस्पर समन्वयातून घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला .यामुळे केज व आंबेजोगाई मधील हजारो नागरिकांना घरकुला सह इतर योजनेचा लाभ मिळणे शक्य होणार आहे.

