शेळया व बोकड चोरीच्या गुन्हयातील ३ आरोपींना व २ विधीसंघर्ष बालकांना इंदापुर पोलीसांनी जेरबंद करून चोरीचे १७ गुन्हे केले उघड...
इंदापूर प्रतिनिधी:
इंदापुर पोलीस स्टेशन अंकीत बावडा पोलीस दूरक्षेत्र, निमगाव केतकी, सरडेवाडी या परीसरात शेतकऱ्यांची शेळया, बोकड चोरी करणाऱ्या ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
सदर प्रकरणी मेजर उर्फ सोमनाथ सिताराम मोरे, पॉयझन उर्फ प्रथमेश भोसले दोन्ही रा.रेडा ता. इंदापुर जि. पुणे निलेश बाबासाहेब सरवदे रा.काटी ता.इंदापूर जि. पुणे व दोन विधीसंघर्ष बालकांचा यात समावेश आहे. यामध्ये पोलिसांनी ५३ हजार ५०० रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, निमगाव केतकी, सरडेवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेळ्या, बोकड चोरीच्या वाढत्या प्रमाणाच्या अनुषांगाने इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी बावडा पोलीस दूरक्षेत्र तपास पथकातील स.पो.नि. नागनाथ पाटील, सहा. फौजदार के.बी. शिंदे, पो.ना.गायकवाड पो.कॉ. विनोद लोखंडे, आरीफ सयद, विक्रम जमादार यांना बोलावुन चोरीचे गुन्हे उघड करण्याबाबत सुचना दिल्याने स.पो.नि. नागनाथ पाटील व बावडा तपास पथकाने प्राप्त माहीतीच्या आधारे १) मेजर उर्फ सोमनाथ सिताराम मोरे २) पॉयझन उर्फ प्रथमेश भोसले ३) निलेश बाबासाहेब सरवदे व दोन विधीसंघर्ष बालक यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानी १ ठिकाणी चोरी केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडुन इंदापुर पोलीस स्टेशनचे १७ गुन्हे उघड करून चोरीमधील ५३ हजार ५०० रुपये रोख रक्कम मुददेमाल जप्त केला आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल,अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहा.सहा.फौजदार के. बी शिंदे, पो. हवा जाधव, पो.ना.सुनील कदम, पो.ना. कळसाईत, पो.ना.गायकवाड, पो.ना. हेगडे, पो. कॉ. अकबर शेख, विक्रम जमादार, गणेश डेरे, विनोद लोखंडे, नंदु जाधव व आरीफ सयद यांनी केली.

