shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय मोफत गणवेशाचे वाटप

गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय मोफत गणवेशाचे वाटप.

 पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निरवांगीतील आ.  दत्तात्रय भरणे  यांच्या आमदार निधीतून गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय मोफत गणवेशाचे वाटप
इंदापूर प्रतिनिधी: सोमवार (दि. ७ ऑगस्ट)   पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय, निरवांगी, (ता. इंदापूर )येथे इंदापूर तालुक्याचे माझे राज्यमंत्री आणि  आमदार  दत्तात्रय भरणे  यांच्या आमदार निधीतून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे  संस्थापक- अध्यक्ष  प्रा. डॉ. हणमंत संपतराव पोळ आणि प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा सह. बँक, शाखा - रेडणी चे शाखा अधिकारी  दिलीप कुमार गोसावी , पुणे जिल्हा सहकारी बँक, शाखा- निमसाखर चे  चव्हाण  तसेच पुणे जिल्हा सहकारी बँक, शाखा- रेडणी चे  शिंदे  उपस्थित होते.
 सदर कार्यक्रमात प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी आणि पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
  या कार्यक्रमात इ.५ वी ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना  आमदार  दत्तात्रय भरणे  यांच्या निधीतून मिळालेल्या शालेय मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे  उपाध्यक्ष विठ्ठल पवार, संस्थेचे विश्वस्त  शिवाजीराव  पोळ,  सोमनाथ पोळ तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  आणि विद्यार्थी उपस्थित होते.
 यावेळी संस्थेचे विश्वस्त  शिवाजीराव  पोळ यांनी आपले विचार व्यक्त करताना  विद्यालयाची स्थापना, विद्यालयाची प्रगती तसेच आत्तापर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.
           संस्थेचे संस्थापक- अध्यक्ष  प्रा. डॉ.  हणमंत  पोळ यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, विद्यालयातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी इंदापूर तालुक्याचे  आमदार  दत्तात्रय भरणे  यांच्या निधीतून दिलेल्या शालेय गणवेशाची मदतीबद्दल आमदार साहेबांचे आभार व्यक्त केले. संस्थेने आणि विद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला, आजपर्यंत  विद्यालयातून अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च विद्या विभूषित झालेले आहेत, आणि मोठ्या पदावर  सध्या काम करत आहेत., याचा संस्थेला आणि विद्यालयाला मोठा अभिमान आहे.योग्य नियोजनातून संस्थेचे आणि विद्यालयाचे कामकाज चालू आहे. आजपर्यंत संस्थेला  केलेल्या मदतीचा उल्लेख सुद्धा आवर्जून केला.
               कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक  शिरसट सर यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.
       सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील सहशिक्षक  सुनील कोथेरे सर यांनी  केले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रीय गीताने करण्यात आला.
close