shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अशोक कॉलेज ऑफ फार्मसीला परवानगी.फार्मसी करीता कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरुः सौ.मुरकुटे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
दुरदृष्टी आणी खंबीर नेतृत्व असलेले तालुक्याचे माजी आमदार,तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या काॕलेज आॕफ फार्मसीच्या डी.फार्मसीला परवानगी मिळाली असून प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती संस्थेच्या कार्यकारी अधिकारी व कारखाना संचालिका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.

सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी याबाबत माहिती देताना सांगीतले की, अशोक कॉलेज ऑफ फार्मसी (डी.फार्मसी) हे महाविद्यालय सेकंड कॅंप राऊंड (Cap-2) मध्ये ऑनलाईन आलेले आहे. महाविद्यालयाचा ऑनलाईन प्रवेशासाठी (DTE CODE-5519) असा कोड आहे. अशोक कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडमध्ये option फॉर्म भरून प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे व उपाध्यक्ष योगेश विटनोर, सहसचिव भास्कर खंडागळे यांनी केले आहे.
      याबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य अंजाबापू शिंदे व प्रा.अरुण कडू म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप डी.फार्मसी मध्ये ऑनलाईन फॉर्म भरला नाही अथवा कुठलीही प्रोसेस केलेली नाही अशा प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्रा.रामेश्वर पवार (९७३०९८१७३५), प्रा.प्रमोद म्हसे (७७२२०८७३५७), तुषार शेरकर (९५४५४६२४९८) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य शिंदे व प्रा.कडू यांनी केले आहे.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close