shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेलापूर महाविद्यालयाची कु.प्रणाली पाटील हंबर्डे हिचा राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक


श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाची द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी कु.प्रणाली पांडुरंग पाटील हिने आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हंबर्डे महाविद्यालय आष्टी येथील बन्सीधर हंबर्डे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

"नवीन शैक्षणिक धोरण व रोजगाराच्या संधी" या विषयावर तिने आपले वक्तृत्व प्रतिपादित केले. तिच्या या यशाबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था, उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव ॲड. शरद सोमाणी, सहसचिव दिपक सिकची ,चेअरमन राजेश खटोड, विश्वस्त नंदूशेठ खटोड, भरत साळुंके,चंद्रशेखर डावरे, श्रीवल्लभ राठी, रविंद्र खटोड, बापूसाहेब पुजारी,ॲड.विजय साळुंके, प्रेमा मुथ्था,नारायणदास सिकची, राजेंद्र सिकची, सौ.सुविद्या सोमाणी,प्रा.हंबीरराव नाईक,शिक्षक प्रतिनिधी नामदेव मोरगे , महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ गुंफा कोकाटे, वक्तृत्व समिती प्रमुख डॉ.बाळासाहेब बाचकर, डॉ.अशोक माने,प्रा.ओंकार मुळे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी सेवक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी ,समस्त ग्रामस्थ आदिंनी तिचे अभिनंदन केले आहे तसेच शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून तीचे अभिनंदन केले जात आहे.

संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close