shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री छत्रपती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा रक्षाबंधनाचा सामाजिक उपक्रम .

श्री छत्रपती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा रक्षाबंधनाचा सामाजिक उपक्रम .
इंदापूर प्रतिनिधी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्री.छत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालय भवानीनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेविकांनी सामाजिक बांधिलकीचा  वसा आणि वारसा जपत रेव्ह. हरिभाऊ वाघमोडे पाटील प्रतिष्ठानच्या बोरी येथील बाल विकास केंद्र बोरी आश्रमातील मुलांना राख्या बांधून  एक वेगळा आदर्श समाजात निर्माण केला. त्या बरोबरच महाविद्यालयात दि.31/08/2023 रोजी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना विभागतील  स्वयंसेविकांनी महाविद्यालयांतील मुलांना  राखी बांधून साजरा केला.सदर कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. संजय मोरे होते.तर प्रमुख पाहुण्यां म्हणून प्रा.अपर्णा पवार होत्या. कला.शाखाप्रमुख प्रा.माने-देशमुख एस.एस.वाणिज्य शाखाप्रमुख प्रा. तरंगे योगिता कार्यालय अधीक्षक श्री.सुशील निंबाळकर उपस्थित होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पांढरमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
      सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शीतल रणनवरे यांनी केले.राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. बाबासाहेब चव्हाण यांनी आभार मानले.या कार्यक्रमास  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिकेतर कर्मचारी यांना राखी बांधून  रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
close