इंदापूर पतंजलि योग समितीच्या वतीने रक्षाबंधनाचा सण साजरा..
इंदापूर प्रतिनिधी: बहिण भावाच्या अतुट ,पवित्र नात्याचा समृध्द सांस्कृतिक वारसा असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. इंदापूर पतंजलि योग समितीच्या वतीने नगरपालिकेजवळील शाळा नं.१ व २ येथे चालु असलेल्या मोफत स्थाई योगवर्गामध्ये सर्व योगसाधक बंधुभगिनी यांनी अतिशय उत्साहात आनंदाने साजरा केला.
मुस्लिम योगशिक्षिका सायराभाभी आतार यांनी हिंदू मुस्लिम हा भेद विसरुन पहाटेच्या योगमय भक्तिमय वातावरणात रक्षाबंधन कार्यक्रमाचे अतिशय देखणे आयोजन केले होते.
.योगशिक्षिका स्वाती वणवे यांनी रक्षाबंधन सणाच्या हिंदू परंपरेनुसार ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व सांगितले.नात्यामध्ये निर्माण होत चाललेला दुरावा, ,मुलींमध्ये असुरक्षितता, बिघडत चाललेली संस्कृती टिकवायची असेल तर असे सांस्कृतिक सण साजरे होणे गरजेचे आहे.यावेळी त्यांनी रक्षाबंधन सणावर आधारीत स्वरचित कवितांचेही गायन केले.
राखीचा रेशमी धागा बांधत योगवर्गातील सर्व बांधवांना ओवाळण्यात आले यावेळी ओवाळणीची भेट म्हणुन फुलझाडाचे रोपटे भेट देण्यात आले.
कार्यक्रमासाठी योग समितीच्या जयश्री खबाले, वर्षा ननवरे,अर्चना काळपांडे,जयश्री सरवदे,वर्षा नागणे,उमा झोळ,योगिता चोपडे, रुपाली राऊत ,मनिषा शेवाळे कविता हराळे यांचेसह बहुसंख्य महिलाभगिनी उपस्थित होत्या..

