shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर शहरांमध्ये पार पडल्या राजमाता ग्रुप आयोजित भव्य मंगळागौर स्पर्धा.

इंदापूर शहरांमध्ये पार पडल्या राजमाता ग्रुप आयोजित भव्य मंगळागौर स्पर्धा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर मध्ये राजमाता ग्रुप आयोजित श्रावण सखी सोहळा च्या निमित्ताने  भव्य मंगळागौर स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन सौ.शोभामामी भरणे यांच्यासह सौ गटकुळ मॅडम, सौ.अनुराधा गारटकर, सौ.अंकिता शहा ,नायब तहसीलदार सौ.मखरे मॅडम,श्रीमती शकुंतला मखरे, सौ. सुषमा गाढवे, सौ. उमा इंगोले,सौ भोर मॅडम तसेच ग्रुपच्या अध्यक्षा सौ. मयुरा पाटील, उपाध्यक्ष सौ.स्मिता पवार व सौ.अश्विनी कवितके,खजिनदार सौ. संगीता कवितके, सचिव श्रीमती.कोकाटे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली.
प्रस्ताविक करताना मयुरा पाटील म्हणाल्या की, स्पर्धा राबविण्या मागे ग्रुपचा उद्देश हाच आहे की महिलांना हक्काचा व्यासपीठ मिळावं, रोजच्या धावपळीच्या जीवनातून घरातील कामातून थोडासा वेळ त्यांना स्वतःसाठी देता यावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
स्पर्धा सुरू होण्याआधी ग्रुपची प्रार्थना झाली आणि स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेमध्ये पहिल्या तीन ग्रुपला बक्षिसे मिळाली त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस जय भवानी ग्रुप ,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जय इन्स्टिट्यूट इंदापूर ,तृतीय क्रमांकाचे बक्षीस महाराष्ट्राची लोकधारा ग्रुप यांनी पटकविले.
सोलो डान्स मध्येही तीन प्रमुख बक्षिसे व उत्तेजनार्थ दोन बक्षीस देण्यात आली. उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते .लकी ड्रॉ मध्ये पाच बक्षिसे देण्यात आली. त्यामुळे उपस्थित महिलांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ.स्नेहा रोडे व सौ.मिनल बोरा यांना आमंत्रित केले होते. ग्रुपच्या वतीने अतिशय देखणे व चोख नियोजन करण्यात आले होते.
 प्रमुख पाहुण्यांचा 'झाडे लावा झाडे जगवा' या उपक्रमांतर्गत रोपे देऊन सत्कार करण्यात आला.
शेवटी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
close