shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरडेवाडी टोल प्लाझा स्थानिक वाहनांना टोल मध्ये सवलत द्या फसवणूक थांबवा नाहीतर शिवसेना स्टाईल आंदोलन - अशोक बाबु देवकर

सरडेवाडी टोल प्लाझा स्थानिक वाहनांना टोल मध्ये सवलत द्या फसवणूक थांबवा नाहीतर शिवसेना स्टाईल आंदोलन - अशोक बाबु देवकर
 इंदापूर प्रतिनिधी :- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सरडेवाडी टोल प्लाझा स्थानिक वाहनांना टोल मध्ये सवलत न देता फसवणूक केली जात.असे  मत  अशोक बाबु देवकर (शिवसेना इंदापूर शहर प्रमुख) यांनी निवेदन देव व्यक्त केले. सरडेवाडी टोल प्लाझा व राष्ट्रीय महामार्गासाठी इंदापूर तालुक्यातील भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या होत्या व आहेत. सदर राष्ट्रीय महामार्गाच्या सरडेवाडी टोल प्लाझा येथून स्थानिक (लोकल) वाहने ये जा करत असतात. सदर वाहनांना दिवसातून दोन ते तीन वेळा ये जा करावी लागते शासनाच्या नियमाप्रमाणे सदर वाहनांचे फास्टॅग आहेत. परंतु स्थानिक वाहनांना स्थानिक टोल नाक्यावर सवलत मिळणे आवश्यक आहे.
असे असताना सदरचे वाहन स्थानिक आहे हे पाहिल्यानंतर टोल प्लाजा वरील कर्मचाऱ्याकडून वाहन सोडून दिले जाते परंतु एक ते दीड किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपला टोल टॅक्स कापण्यात आलेला आहे असा संदेश मोबाईल द्वारे दिला जातो व पैसे वजा होतात. याचाच अर्थ राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाजा कडून स्थानिक (लोकल) वाहनधारकांची घोर फसवणूक होत असून त्यांना कोणत्याही प्रकारे टोल मध्ये सवलत दिली जात नाही.
तरी सरडेवाडी टोल प्लाझा येथे स्थानिक वाहनांना टोल मध्ये सवलत देण्यात यावी व कोणत्याही परिस्थितीत वाहनाचा क्रमांक घेऊन अथवा फास्टॅग द्वारे रक्कम वसूल करण्यात येऊ नये. अन्यथा या प्रकाराकडे शासनाचे वेधण्यासाठी नाईलाजाने रोजी १०/०९/२०२३ शिवसेना स्टाईल आंदोलन करावे लागेल  असे निवेदन देऊन   अशोक बाबु देवकर (शिवसेना इंदापूर शहर प्रमुख)यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी इंदापूर शहर कार्याध्यक्ष अशोक राजगुरू, इंदापूर शहर उपप्रमुख देवा मगर, इंदापूर शहर उपप्रमुख योगेश गुजर इत्यादी उपस्थित होते.
close