बी.आर.चेडे - शिरसगांव
श्रीरामपूर तालुक्यातील हरिगांव येथील राज्यात प्रसिद्ध अशा मतमाऊली यात्रेचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने त्या सोहळ्याचे निमंत्रण तालुक्याचे आ.लहू कानडे यांना हरिगांव प्रमुख धर्मगुरू डॉमनिक यांनी शिष्ट मंडळ समवेत दिले. त्यावेळी यात्रेसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा द्याव्यात यासाठी चर्चा झाली.त्यात पिण्याच्या पाण्याची टाकी, स्वच्छता गृह आदी प्रश्नावर चर्चा झाली.
खैरी ते हरिगांव रस्ता सततच्या मळी टँकर वाहतूकीने फारच खराब झाला आहे, रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत.हरिगांव मतमाऊली यात्रा जवळ आल्याने तो रस्ता यात्रेपूर्वी दुरुस्त व्हावा. तसेच ऊन आणी पावसामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी भाविकांसाठी एक मोठा मंडप उभारण्यात यावा, आदी बाबींसाठी सहकार्य व्हावे अशी मागणी केल्याने आ. लहू कानडे यांनी आवश्यक सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिले.
हरिगांव मतमाऊली यात्रेमध्ये उपस्थितसाठी माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, तालुका पोलीस विभाग आदी सर्वाना निमंत्रण देण्यात आले असून तालुका पोलीस निरीक्षक चौधरी यांनीही यात्रेपूर्वी शांतता कमिटीची बैठक आयोजित करून योग्य त्या सूचना संबंधीतांना देण्यात येतील असे म्हटले आहे. हरिगांव, उंदीरगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांचेही शांतता कमिटी,आदी कार्यात महत्वाचे योगदान असते. यावेळी डी.एस. गायकवाड, सुभाष पंडित, बी.सी. मंडलिक, पीटर जाधव,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बी.आर. चेडे आदी उपस्थित होते.
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

