shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तिखी येथे कृषीकन्यांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव अनुभव(RAWE )या कार्यक्रमाचे उद्घाटन.

तिखी येथे कृषीकन्यांच्या वतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव अनुभव(RAWE )या कार्यक्रमाचे उद्घाटन.
शिर्डी एक्सप्रेस प्रतिनिधी:  मौजे तिखी ता. कर्जत येथे डॉक्टर शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय बारामतीच्या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभव अनुभव कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंच राजेंद्र खवळे ,ग्रामसेवक ढोले भाऊसाहेब, माजी सरपंच बाळासाहेब दळवी, माजी सरपंच संजय अडसूळ, संजय कोरडे व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. यावेळी सदर मान्यवरांचा विद्यार्थ्यांनी मार्फत फुल रोप देऊन सत्कार करण्यात आला .
सदर कार्यक्रमांमध्ये कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अनुभव (RAWE ) या कालावधीमध्ये राबवले जाणारे विविध प्रात्यक्षिके आणि उपक्रम इत्यादी ची माहिती दिली. याप्रसंगी संकेत कोरडे यांनी कृषीकन्यांना गावाकडून संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.
 याच कार्यक्रमांमध्ये केंद्र शासनाच्या राबवीत असलेल्या मेरी मिट्टी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अभियानांतर्गत पंचप्राण शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी कृषी कन्यांना कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. गायकवाड व प्रा. एस. व्ही. बुरुंगले यांनी प्रोत्साहन दिले. गावकऱ्यांनी कृषी कन्यांना मंगल दिवटे, वैष्णवी गायकवाड, अपेक्षा हरगुडे, आरती जाधव, तेजस्विनी मारकड, वर्षा पांढरे, शिवांजली रणवरे यांचे कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार मानले.
close