प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. ६/ करमाळा शहरातील देवीचा माळ रोडवरील भवानी नाका येथील आयडीबीआय बँकेवर चोरट्यांनी दरोडा घातला. याबाबत करमाळा पोलीस अधिक तपास करीत आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृष्यानुसर आज रविवारी पहाटे पाच ते साडे पाच च्या दरम्यान काळ्या रंगाच्या कारमधून तोंडाला मास्क बांधून ४ जण आले होते त्त्यापैकी दोघेजण बाहेर थांबले आणि दोघांनी एटीएम मध्ये प्रवेश करताच सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून सीसीटीव्ही प्रथमत: निकामी केला आणि कटरने एटीएम फोडून मशीनमधील जवळपास 13 ते 15 लाख रुपयांची रक्कम लंपास केली. सदर घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला आहे.
दरोडेखोरांच्या तपासासाठी श्वान पथक आणि हातांचे ठसे तज्ञही बोलवण्यात आले होते. सदर चोरटे अहमदनगर/ टेंभुर्णी/ परांडाच्या दिशेने गेले असण्याची शक्यता आहे. तरी वरील रंगाची कार मिळून आल्यास तात्काळ करमाळा पोलीस ठाणेशी संपर्क साधावा असे आवाहन आयडीबीआय बँकेचे कर्ज शाखा अधिकारी योगेश ढगे आणि करमाळा पोलिसांनी केले आहे.

